नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तवली फाटा भागात बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी १ लाख २१ हजार ४५० रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे आणि गॅस सिलेंडर चोरुन नेले. या चोरीची पांडूरंग चिमणा कामडी (रा.समर्थनगर,इंद्रप्रस्थ नगर पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामडी परिवार सोमवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व घरातील दोन गॅस सिलेंडर असा सुमारे १ लाख २१ हजार ४५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिक्षक घडवजे करीत आहेत.