नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरीस गेल्या आहे. याप्रकरणी पंचवटी,सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. यमुनाबाई धनराज उर्फ धनंजय गोसावी (रा.जीवनधारा रो हाऊस,श्रमिकनगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. गोसावी यांची शाईन एमएच १५ ईझेड ४५९२ दुचाकी गेल्या १० जुलै २०१९ रोजी रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत. दुसरी घटना सुके नकर लेन भागात घडली. येथे राहणारे अनिल भिमराव क्षिरसागर (रा.श्रीदत्त अपा.क्षिरसागर वाड्या समोर) यांची बॉक्सर एमएच १५ ए झेड ६२८३ गेल्या १३ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बैरागी करीत आहेत. तिसरी घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पांडवेलणी भागात राहणारे संजय किसन साळवे (रा.कवठेकरवाडी,पांडवलेणी) हे गेल्या ३० नोव्हेंबर रोजी पाथर्डी फाटा परिसरातील सप्तश्रृगी हॉस्पिटल परिसरात गेले होते. मच्छी मार्केट समोर त्यांनी आपली एमएच १५ जीजे ३९२२ मोटारसायकल पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.