नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळीरोड भागात गेस्ट हाऊसच्या आवारातील दोन चंदनाची झाडे तस्करांनी कापून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल नामदेव अडकमोल (रा.अरिंगळे मळा,एकलहरारोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अडकमोल टाकळी रोड येथील शांती पार्क भागात असलेल्या मिथीला गेस्ट हाऊस येथे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. सोमवारी (दि.१४) अडकमोल व सहकारी किरण आहेर हे दोघे कर्मचारी सिक्युरिटी कॅबीन मध्ये असतांना अज्ञात चार चोरट्यांनी आवारात प्रवेश करून परिसरातील दोन चंदनाची झाडे कापून नेली. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.