नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीत सेंट्रींगचे काम करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हिरामण रामदास गोराळे (रा.गोळाशी ता.जि.नाशिक) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोराळे सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास शान मारूती कार शोरूम समोरील निरज एजन्सी प्रा.लि. कारखाना भागातील नुतन इमारतीवर सेंट्रींग काम करीत असतांना ही घटना घडली. इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने गोराळे जखमी झाले होते. अन्य कामगारांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.