नाशिक – गडकरी सिग्नल जवळ कार आणि अॅटो रिक्षात झालेल्या अपघातात ४५ वर्षीय प्रवासी महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. मंगला हरीशचंद्र शिंदे (४५, रा. तान्हाजी चौक, दिंडोरी रोड) असे अपघातात ठार झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. मंगला शिंदे या मंगळवारी सकाळी साडे पाचच्या वाजेच्या सुमारास सीबीएसकडून गडकरी सिग्नलच्या दिशेने रिक्षातून प्रवास करीत असताना हा अपघात झाला. रिक्षास भरधाव एमएच १७ एझेड ५०९३ क्रमांकाच्या कारने धडक दिल्याने मंगला गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुबंईनाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.