नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठ तालुक्यातील हनुमंतपाडा येथे अंगणात खेळतांना पडल्याने डोक्यास मार लागून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. रोहिनी अंबादास तुंबडे (रा.हनुमंतपाडा – भुवन ता.पेठ) असे मृत बालिकेचे नाव आहे. रोहिनी तुंबडे ही बालिका शुक्रवारी आपल्या राहत्या घरासमोर अन्य मुलांसमवेत खेळत असतांना ही घटना घडली होती. खेळता खेळता पडल्याने तिच्या डोक्यास दुखापत झाली. मामा प्रभाकर अल्हाट यांनी पेठ येथील शासकिय रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तपासून तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.