इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिने सांगितले की, ती एपिलेप्सी (फीट येणे) या आजाराशी झुंज देत आहे. अभिनेत्रीने चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले की, ती औषधे आणि वर्कआउट्सच्या माध्यमातून स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न करत आहे. एपिलेप्सीच्या आजाराने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर कसा परिणाम केला आहे, हे सुद्धा तिने व्यक्त केले.
फातिमा सना शेखने सांगितले की, तिला बाकीच्यांपेक्षा थोडे हळू चालावे लागते. कधीकधी विचित्र गोष्टी घडतात आणि काही दिवस कठीण असतात. जरी ती सर्वकाही करू शकते, परंतु कधीकधी काही कठीण प्रसंग येतात जेव्हा तिच्या हालचाली हळूवार होतात.
तथापि, इंडस्ट्रीच्या संस्कृतीचे आभार मानताना फातिमाने असेही म्हटले की ती त्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे ज्यांना ज्या लोकांसोबत काम करायचे आहे त्यांच्यासोबत काम करण्यास सक्षम आहे. या आजारामुळे तिचे आयुष्य थोडे कठीण झाले आहे, पण त्यामुळे तिचा उत्साह कमी झालेला नाही.
फातिमा सना शेख म्हणाली की, या आजाराने तिला सर्वोत्तम देण्यापासून कधीच थांबवले नाही. खरं तर, या आजाराने तिला नेहमीच कठोर परिश्रम करण्याचे कारण दिले आहे. तिच्या ट्रीटमेंटबद्दल बोलताना फातिमा सना शेखनेही तिच्या कुत्र्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, तिचा कुत्रा बिजली तिच्यासाठी उपचारासारखा आहे. या आजारात लढण्यामध्ये त्याचे मोठे योगदान आहे.
Actress Fatima Sana Shaikh Serious Disease