नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात राहणा-या १८ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. स्नेहा राजेश सिंग (रा.दिपक हाईटस,पंचरत्न बिल्डींग शेजारी,चुंचाळे) असे मृत तरुणीचे नाव आहे. स्नेहाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्नेहा सिंग हिने सोमवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बैठक रूममध्ये पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.