नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून चोरट्यांनी पर्समधील रोकडसह एलईडी व साऊंड सिस्टीम असा ४८ हजाराचा ऐवज चोरून नेला. या चोरीची तृषा महेंद्रकुमार झा (रा.शिवाजीनगर आदर्श नगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झा रविवारी (दि.१३) परिसरातील ड्रिम घरकुल बिल्डींग भागात गेले होते. रस्त्यावर इर्टिका कार एमएच ४३ एटी ६९३६ पार्क करून ते अल्पशा कामासाठी नजीकच गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारचा दरवाजा उघडून पर्स तसेच एलईडी स्क्रीन,साऊंडसिस्टीम असा ४८ हजाराचा ऐवज चोरून नेला. पर्स मध्ये ३५ हजाराची रोकड आणि महत्वाची कागदपत्र होते. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.