बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्य सरकारचा बालरोग तज्ज्ञांबरोबर करार; शाळांमध्ये आता हे होणार

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 4:01 pm
in संमिश्र वार्ता
0
DKE 2 1140x570 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) सोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला आहे. शासकीय शाळांमधून बालकांच्या आरोग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा करारात समावेश आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत रामटेक या शासकीय निवासस्थानी हा करार करण्यात आला. शासनाच्यावतीने शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि आयएपी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, डॉ. समीर दलवाई, डॉ. हेमंत गंगोलिया, डॉ. हेमंत जोशी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय- दीपक केसरकर
”शालेय शिक्षण विभागाअंतर्गत धोरण राबवताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. यासाठी खेळ, आरोग्य या बाबीदेखील महत्त्वाच्या असल्याने इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्ससोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीचा हा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून त्यांचे बौद्धिक आणि शारीरिक आरोग्य राखले जाईल आणि त्याचा शैक्षणिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल”, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

संकल्प – संपूर्ण स्वास्थ्य
या करारानुसार तीन ते नऊ आणि दहा ते अठरा या दोन वयोगटांमधील मुलामुलींची, शिक्षकांची आणि पालकांची कार्यशाळा, थेट संवाद आदी उपक्रम हाती घेतले जातील. हे उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संपूर्णतः आयएपीची राहणार असून राज्य शासन यासाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे. विद्यार्थ्यांचा समग्र विकास घडवून आणणे, या शासनाच्या धोरणास अनुसरून हा उपक्रम राबविला जाणार आहे. या करारांतर्गत शालेय शिक्षण विभागामार्फत दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये प्रगती व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे आयएपी ही संस्था बालकांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशभर ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पालक, शिक्षक आणि बालकांना शाळांमधून आरोग्यविषयक प्रशिक्षण देणारा कार्यक्रम सुरू करण्याचे योजिले आहे.

याअंतर्गत योग्य व संतुलित पोषण, बाजारात अत्यंत मुबलकपणे उपलब्ध असणाऱ्या अन्न पदार्थांवरील वेष्टन वाचून योग्य/अयोग्य ओळखणे, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य, टीव्ही, मोबाईल यांचा मर्यादित वापर, शारीरिक व्यायाम, पुरेशी निद्रा, पर्यावरणाबाबत सजगता, व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रभावी उपाय आदी उपयुक्त बाबींचे वयोपरत्वे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एकदा प्रशिक्षित झाल्यावर शिक्षकही हा उपक्रम सहजपणे आपापल्या शाळेत पुढे चालू ठेवू शकतील, अशाप्रकारे या कार्यक्रमाची रचना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा केली जाईल, अशी माहितीही कराराच्यावेळी देण्यात आली.

Maharashtra Government MOU Pediatricians
School Students

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पार्क केलेल्या कारमधून चोरी; ४८ हजाराचा ऐवज चोरीला

Next Post

बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरावर सुप्रीम कोर्ट संतप्त; केंद्र सरकारला ठणकावून विचारले, ‘तुम्ही काय करताय?’

India Darpan

Next Post
SC2B1

बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरावर सुप्रीम कोर्ट संतप्त; केंद्र सरकारला ठणकावून विचारले, 'तुम्ही काय करताय?'

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011