नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बजरंगवाडी येथे पैसे न दिल्याने दोघांनी तरूणास बेदम मारहाण करुन चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संकेत नंदू तोरडमल (२१ रा.निरामय मेडिकल समोर बजरंगवाडी) या संशयिताला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी याप्रकरणी मयुर सोमनाथ भगत (२२ रा.गोरख किराणा जवळ,बजरंगवाडी) या तरूणाने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगत गुरूवारी (दि.१०) रात्री आपल्या घराकडे पायी जात असतांना परिचीत असलेल्या तोरडमल व त्याच्या एका साथीदाराने भगत यांची वाट अडवित पैश्यांची मागणी केली. यावेळी भगत यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त तोरडमल याने कमरेला लावलेला चाकू काढून भगत यांच्यावर वार केले. या घटनेत भगत याच्या पोटावर वार करीत असतांना हातावर चाकूचा वार झेलल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.