गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळाली कॅम्पमध्ये तरूणाची निर्घृण हत्या; अमोल पठाडे यांच्यासह चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 4:07 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प भागात हिंगोली येथील तरूणाची निर्घृण हत्या प्रकरणात अमोल पठाडे यांच्यासह चार जणांना पोलिासंनी ताब्यात घेतले आहे. यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे या तरूणाला देवळाली कॅम्प पोलिसांनी छावणी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

गणेश पंजाब पठाडे (२६,रा.शिरसम, हिंगोली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तो आपल्याच बहिणीस सासरी सोडण्यासाठी भगूर येथे आला होता. सकाळी नाश्ता केल्यानंतर तो घराबाहेर पडला मात्र संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. दरम्यान, संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भगुर-देवळाली कॅम्प रस्त्यावर एक युवक बेशुद्धावस्थेत बेवारसपणे पडल्याची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गणेश पठाडे यास पोलिसांनी तात्काळ देवळाली कॅम्प येथील छावणी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे सायकाळी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रात्री मयत घोषित केले. गणेशची बहिणी प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशीरा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मित्राच्या मदतीने बेदम मारहाण
गणेशचा चुलता भाऊ आरोपी अमोल अंबादास पठाडे (वय २८, रा. विहितगाव, नाशिक) याने मित्रांच्या मदतीने त्याला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याचे बहिणीने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अमोल पठाडे याच्यासह चार जणांना ताब्यात घेतले असून, यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हे आहे मारहाणीचे कारण
गणेशच्या खूनाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले की, मयत गणेश हा अमोलच्या आईला अश्‍लिल मेसेज करायचा, फोन करायचा. त्याच्या या त्रासाला अमोलची आई कंटाळली होती. अमोलला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने गणेशचा काटा काढायचा असे ठरवले होते. गणेश नाशिकमध्ये आला असल्याचे समजताज अमोलने ही संधी सोडायची नाही, असे ठरविले. त्याने गणेशला गाठत शेवटी त्याचा काटा काढला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परदेशात घर घेवून द्यावे या मागणीसाठी मुलीसह नातवंडाना डॉक्टर जावयाने अमेरिकेत डांबून ठेवले

Next Post

घरफोडी करून बुलेट पळवून नेणा-या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड; बुलेटसह ५ लाखाचा ऐवज केला हस्तगत

Next Post
प्रातिनिधीक फोटो

घरफोडी करून बुलेट पळवून नेणा-या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड; बुलेटसह ५ लाखाचा ऐवज केला हस्तगत

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011