नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५४ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना पाथर्डी रोडवरील मेट्रोझोन भागात घडली. या घरफोडीत सोन्याचांदीच्या दागिण्यांसह एका मलेशियन नोटचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस अशोकराव चव्हाण (रा.शामदेव अपा.नवीन पाण्याच्या टाकीजवळ, समर्थनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण कुटुंबिय गेल्या रविवारी (दि.३०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे आणि मलेशियन नोट चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.