नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून ठाणे येथील महिलेवर नाशकात बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ठाणे पोलिसात तक्रार दाखल झाल्याने हा गुन्हा अंबड पोलिसांकडे वर्ग झाला आहे. पीडिता व संशयित ठाणे शहरात वास्तव्य करतात. कामानिमित्त शहरात राहणा-या संशयिताने महिलेस रजिस्टर लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून नाशकात सोबत राहण्यास भाग पाडले. या काळात महिला दोन वेळा गर्भवती राहिली. त्यानंतर संशयिताने महिला व तिच्या मुलीचा सांभाळ न करात पोबारा केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.