नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात इमारतीच्या तिस-या मजल्यावरून तोल जावून पडल्याने २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. दिप सचिन सावे (रा.साई सिंफणी अपा.महात्मानगर)असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावे शनिवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरून तोल जावून पडला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने शेजारी सतिष भोसले यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक गवे करीत आहेत.