महिलेचा घरमालक असलेला बापलेकाने केला विनयभंग; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाडेकरू म्हणून राहत असलेल्या महिलेचा घरमालक असलेल्या बापलेकाने विनयभंग केल्याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता संशयित सुधाकर सिद आणि विवेक सिद (रा.दोघे ठाणे) यांच्या मालकीच्या सदनिकेत भाडेतत्वावर राहत होती. वेळेवर भाडे देत नाही आणि घरही खाली करीत नाही या वादातून हा प्रकार न्यायालयात दाखल झाला होता. न्यायालयाने सदर घर सिल केले होते. तरीही पीडिता तेथे वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे घरमालक असलेल्या संशयितांनी न्यायालयाच्या आदेशाने पोलिस बंदोबस्तात घरखाली केले असता ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीनुसार गेल्या १२ एप्रिल रोजी महिलेस घराबाहेर काढून पोलिस घराचा ताबा घेत असतांना पीडिता आपले व्यक्तीगत वस्तू घेण्यासाठी घराच्या दिशेने जात असतांना घरमालक असलेल्या संशयितांनी बिल्डींग आवारात पकडून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसांचे उंबरठे झिजवले मात्र दाद न मिळाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.
भररस्त्यात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत बुधवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास रस्त्याने पायी जात असतांना एका महिलेला अडविले. यावेळी संशयितांने भररस्त्यात पदर पकडून शिवागाळ करीत मुलीला पाठव नाही तर तू ये असे म्हणत या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.