नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील हॉटेल उत्तम हिरा भागात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली. संदिप दिलीप आहेर (रा. वाढणे कॉलनी,संभाजीनगर दिंडोरीरोड) असे अपघातात मृत झालेल्या पादचा-याचे नाव आहे. हा अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला. या अपघाताची भाऊ योगेश आहेर यांनी तक्रार दिली असून अज्ञात वाहनचालका विरुध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहेर सोमवारी पेठरोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. पेठरोडवरील हॉटेल उत्तम हिरा भागातून तो पायी जात असतांना नाशिककडून पेठच्या दिशेने भरधाव अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदिप आहेर यांचा अतिरक्तश्रावाने मृत्यू झाला. अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला. असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्ही.डी.आहेर करीत आहेत.