नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयशर मालट्रकसह चोरट्यांनी वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी सातपूर, पंचवटी, आडगाव आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजेलली माहिती अशी की, सातपूर येथील शरद बाळासाहेब निफाडे (रा.कांबळेवाडी) यांच्या मालकिचा एमएच ४६ एफ ००८२ हा आयशर मालट्रक गेल्या २७ सप्टेंबर रोजी त्र्यंबकरोडवरील एसआय हॉस्पिटलच्या प्रवेशद्वार भागात पार्क केलेला असतांना चोरट्यांनी तो पळवून नेला. सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून न आल्याने याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत. नांदूरनाका भागातील योगेश मधुकर खरोटे (रा.जनार्दननगर) हे गेल्या मंगळवारी (दि.४) गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे गेले होते. गाडगे महाराज पुलाजवळ पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ सीजी ०२२० चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत. दुचाकी चोरीची दुसरी घटना अमृतधाम भागात घडली. निलेश किरण वडनेरे (रा.शुभम पॅलेस,अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली आहे. वडनेरे यांची स्प्लेंडर एमएच १९ बीडी ३८१० सोमवारी (दि.१०) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. तर सचिन परसराम गाढवे (रा.वेलद गव्हाण रोड,दे.कॅम्प) हे गेल्या शनिवारी (दि.१) औद्योगीक वसाहत परिसरातील डीजीपीनगर भागात आले होते. गुरूकृपा मेडिकल समोर पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ एफआर १२३२ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
….