नाशिक – शहरातील वेगवेगळया भागातून घरासमोर पार्क केलेल्या इर्टिगा कारसह दोन मोटारसायकली चोरील गेल्या आहे. याप्रकरणी म्हसरूळ, सातपूर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कलानगर येथील शुभम किरण वाणी (रा.अक्षरव्हीला रो हाऊस,लेन.नं.१ यांची इर्टिगा कार एमएच १५ एफटी ८१९८ सोमवारी (दि.२६) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक व्ही.के.माळी करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात घडली. कैलास नथू पारधी (रा.श्रीकृष्ण अपा.पवार संकुल,अशोकनगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पारधी रविवारी (दि.२५) सकाळच्या सुमारास कार्बन नाका परिसरातील गोल्डी प्रिसीजन स्टंम्पींग प्रा.लि. या कारखान्यात गेले होते. कंपनीच्या पार्किंगमधून त्यांची एमएच २० ईसी ३२८५ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.
तर ज्ञानेश्वर निवृत्ती म्हस्के (रा.मांगिर बाबा मंदिराजवळ,कोटमगाव) यांची स्प्लेंडर एमएच १५ ईआर ५९६३ गेल्या सोमवारी (दि.१९) त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.