नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा येथे पत्नीने पतीचा खून करून मृतदेह पलंगाखाली लपवून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. रंगनाथ कदम (५५) रा. हनुमान मंदिराजवळ, माळी गल्ली, वडाळा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
कौटुंबिक वादातून हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी मुलगा कामावरून घरी परतल्यावर त्याला पलंगाखाली वडिलांचा मृतदेह आढळला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.