नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात औरंगाबाद येथील तरूणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण आणि माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. पीडितेच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचे गेल्या दोन तीन वर्षापासून शेजारी राहणा-या औरंगाबाद येथील तरूणावर प्रेम जडले होते. लग्नाचे आमिष दाखवून संशयित तरूणाने मुलीस शहरातील वेगवेगळय़ा हॉटेल आणि लॉजिंगवर घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. या ठिकाणी त्याने दोघांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओही तयार केले. कालांतराने संशयित औरंगाबाद येथे स्थलांतरीत झाला. मात्र तरीही तो अधून मधून शहरात येवून मुलीस फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आपले इप्सित साधत होता. मुलगी सज्ञान झाल्याने कुटुंबियांनी तिचा विवाह उरकण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने वर पक्षाकडील मोबाईल नंबर मिळवून गेल्या महिन्यात होणा-या साखरपुड्याच्या दिवशीच तरूणीच्या कुटुंबियांसह वरपक्षाच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर सदरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. यामुळे विवाह मोडल्याने युवतीने फिनेल सेवन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केल्याने ती बालंबाल बचावली असून तिच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास निरीक्षक राजू पाचोरकर करीत आहेत.