नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मखमलादरोडवरील वर्दळीच्या ड्रीम कॅसल भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. मंदा भिमराव धात्रक (रा.नवनाथनगर,पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धात्रक या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मखमलबादरोड भागात भाजी पाला खरेदीसाठी जात असतांना ही घटना घडली. स्वामी समर्थ केंद्राकडून त्या मखमलाबादरोडच्या दिशेने पायी जात असतांना ड्रिमकॅसलकडून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घिसाडी करीत आहेत.