जेलरोड भागात सासू सुनेस व वृध्दास बेदम मारहाण; एकावर कोयत्याने हल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात सासू सुनेस व वृध्दास बेदम मारहाण करीत दुकलीने एकावर कोयत्याने हल्ला केला असून यात कुटुंबिय जखमी झाले आहे. परिसरात दहशत माजवत दोघा भावांनी कुठलेही कारण नसतांना ही मारहाण केली. या मारहाणप्रकरणी सचिन प्रताप फाजगे (रा.लाकडाच्या वखारी समोर श्रमिकनगर,कॅनोलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक डोंगरे आणि करण डोंगरे (रा.दोघे लाकडाच्या वखारी समोर श्रमिकनगर,कॅनोलरोड) अशी हल्लेखोर बंधूचे नाव आहे. तक्रारदार फाजगे व त्यांचे वडिल प्रताप फाजगे हे दोघे बापलेक बुधवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर उभे असतांना ही घटना घडली. रस्त्याने शिवागाळ करीत जाणा-या संशयितांपैकी एकाने वडिलांना माझ्याकडे काय पाहतो असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी वडिलांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे सचिन फाजगे समजून सांगण्यासाठी गेले असता दीपक डोंगरे याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी झालेल्या आरडाओरडमुळे धावून आलेल्या सासू राधाबाई आणि सून चौताली यांच्यासह वृध्द प्रताप फाजगे यांनाही संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. परिसरात दहशत टिकून राहवी यासाठी संशयितांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात असून अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.
………..
२३ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २३ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना देवळाली गावातील गुलाबवाडी भागात घडली. रोहित सुरेश इंगळे (रा.रमाबाई आंबेडकर नगर,मालधक्कारोड) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहित इंगळे याने गुरूवारी (दि.१) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.उगले यांनी तपासून त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.