गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साधूच्या वेशात असलेल्या टोळी सक्रिय; गळयातील चैन लंपास केल्याच्या दोन घटना

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 3:29 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साधूच्या वेशात असलेल्या टोळीने गळयातील चैन लंपास केल्याच्या दोन घटना घडल्या आहे. या टोळीत साधुसह एक महिला व इतर काही जण असल्याचे बोलले जात आहे. पहाटे घराबाहेर पडणा-यांना या टोळीने लक्ष केले असून ही टोळी कारमधून फिरत आहे. पत्ता विचारण्याचा बहाणा किंवा रूद्राक्ष मणी देण्याचे निमित्त करुन ही टोळी चैन लंपास करत आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरी तर मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरीरोड भागातील भगीरथ रामचंद्र शेलार (६९ रा.बजाज शोरूममागे,शिवागीनगर) हे मंगळवारी सकाळी शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. ओमनगर येथील किशोर सुर्यवंर्शी मार्गाने सव्वा सहा वाजेच्या सुमारास ते पायी जात असतांना प्रमिला आश्रम जवळ पांढ-या कारमधून आलेल्या चालकाने त्यांना थांबविले. यावेळी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठीचा मार्ग विचारण्यात आल्याने शेलार कारजवळ गेले असता ही घटना घडली. कारमधील साधूने शेलार यांना जवळ बोलावून घेत आशिर्वादरूपी रूद्राक्षमणी व शंभर रूपयांची नोट शेलार यांच्या हातावर ठेवली. त्यामुळे शेलार यांनी विश्वासाने गळय़ातील सुमारे ३५ हजार रूपयांची सोनसाखळी काढून बाबाकडे रूद्राक्षमणी लावण्यासाठी दिली असता त्यांना बोलण्यात गुंतवून लॉकेट घेवून पोबारा केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरी घटना गोविंद नगर भागात घडली. पहिल्या घटनेस ४५ मिनीटे उलटत नाही तोच ही घटना घडली. उत्तम रामचंद्र परदेशी (७५ रा.पीस स्क्वेअर अपा.योगेश्वरनगर,गोविंदनगर लिंकरोड) हे मंगळवारी ६.४५ वाजेच्या सुमारास आरडी सर्कल भागात मॉर्निंग वॉक करीत असतांना ही घटना घडली. ऋषी हॉटेल जवळून ते पायी जात असतांना कारमधून आलेल्या टोळक्याने पंचवटीकडे जाण्याचा मार्ग विचारला. यावेळी परदेशी यांना जवळ बोलावून घेतल्याने ते कारमधील बाबाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता बाबाने तुमचे कल्याण होईल असे म्हणत हातावर रूद्राक्षमणी ठेवला. याप्रसंगी परदेशी यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी रूद्राक्षमणी सोन्याच्या सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या गोफ मध्ये लावून देण्याचा बहाणा केला. परदेशी यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने पोबारा केला. हे टोळके पसार झाल्यानंतर परदेशी यांना सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदार सुहास कांदे विधानसभेत आक्रमक; फडणवीसांवर केली ही प्रश्नांची सरबत्ती (व्हिडिओ)

Next Post

चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत; अमित शाह, जे पी नड्डांसह वरिष्ठांसोबत खलबतं

India Darpan

Next Post
IMG 01

चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत; अमित शाह, जे पी नड्डांसह वरिष्ठांसोबत खलबतं

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011