नाशिक – वडाळागावात चार्जरच्या वायरने पतीने आपल्या २९ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. चारित्र्यांच्या संशयातून खून करणा-या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. रिजवान इसाक पठाण (३४ रा.बाग ए तबस्सुम,वडाळागाव) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास पत्नी हुमेरा उर्फ मिनाज रिजवान पठाण (२९ रा.बाग ए तबस्सुम,वडाळागाव) या नेहमीप्रमाणे आपल्या बेडरूममध्ये झोपलेल्या असतांना रिजवानने मोबाईल चार्जीगच्या वायरने गळा आवळला. यात हुमेरा पठाणचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हुमेराचा भाऊ गुलाम शेख यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निरीक्षक वांजळे करीत आहेत.