इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूने सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने पती करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये बिपाशा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. या फोटोंबद्दल चाहते तिचं अभिनंदन करत आहेत, पण बोल्ड फोटोंमुळे तिला खूप ट्रोलही केलं जात आहे.
बिपाशा बसूने तिचे बेबी बंप फ्लॉंट करतानाचे फोटो शेअर केले आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आपल्या जीवनाच्या प्रिझममध्ये एक नवीन छटा जोडत आहे. हे आम्हाला पूर्वीपेक्षा थोडे अधिक पूर्ण करेल. हा प्रवास आम्ही एकट्याने सुरु केला आणि मग आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एकाचे दोन झालो. आमच्या दोघांचे हे प्रेम आम्हाला जणू अन्यायकारक वाटत होते. म्हणूनच आम्ही आता लवकरच, दोघाचे तिघे होणार आहोत…’
बसूने पुढे लिहिले आहे की, ‘आमच्या प्रेमाने तयार केलेली निर्मिती, आमचे मूल लवकरच आमच्या उत्साहात सामील होईल. आमचा एक भाग असल्याबद्दल सर्वांचे आभार. आपल्या जीवनात सामील होण्यासाठी आणि नवीन जीवनासाठी उत्सव साजरा करण्यासाठी. दुर्गा दुर्गा. अवघ्या काही मिनिटांतच या फोटोंना प्रचंड पसंती मिळाली आहे आणि लोक ते प्रचंड शेअर करत आहेत.
बिपाशा बसू काही काळापासून लाइमलाइटपासून दूर होती. अनेक स्टार्ससोबत जोडल्या गेल्यानंतर बिपाशा बसूने २०१६ मध्ये करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले आणि आता तब्बल ६ वर्षांनी तिने प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. बिपाशा बसू ४३ वर्षांची असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.
Actress Bipasha Basu Baby Bump Bold Photo Shoot
Entertainment Pregnancy Announcement