नाशिक : जत्रा हॉटेल ते नांदूरनाका लिंकरोड भागात भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय पादचारी जखमी झाल्याची घटना घडली. माधव जगन्नाथ वाकडे (६५ रा. पार्क साईट होम्स,हनुमाननगर) असे जखमी वृध्द पादचारीचे नाव आहे. यापकरणी राजू वाकडे (रा.ओझर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात पसार झालेल्या कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी माधव वाकडे गेल्या सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास जत्रा हॉटेल कडून नांदूर नाक्याच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. सेंट पिटर शाळेकडे जाणाºया मार्गा जवळून ते पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या वरणा कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वाकडे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.