नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात विनाकारण तरुणाने लोखंडी रॉडने मारल्याची घटना घडली. यात तरूणाचा पाय मोडला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमजद खान (रा.अंबड) असे संशयिताचे नाव असून, याप्रकरणी कमलेश रामदास जाधव (२६ रा.केदारनगर,सातपूर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जाधव गेल्या शनिवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास अशोकनगर येथील नाशिक ब्रॅण्डी हाऊस समोरून जात असतांना संशयिताने त्यास अडविले. यावेळी कुठलेही कारण नसतांना संशयिताने मला शिवी का दिली अशी विचारणा करीत थेट लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणी लोखंडी रॉड पायाच्या घोट्यावर मारल्याने जाधव जखमी झाला असून त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.