नाशिकरोड – दुचाकी गाड्या चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड करुन दहा मोटारसायकली जप्त केल्या आहे. या चोरट्यांकडून दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. अजय प्रवीण दहेकर (२२) रा. पाथर्डी फाटा, अमोल बाळू इंगळे (२३) रा. म्हाडा कॉलनी पाथर्डी फाटा अंबड यांना विधी संघर्षित बालकासह कुकरी सारखे हत्यार जवळ बाळगताना पकडल्यानंतर या तपासात आरोपीचा साथीदार विजय प्रल्हाद आव्हाड (२०) गणेश चौक सिडको यास ताब्यात घेतल्यावर त्याचे कडून दोन मोबाईल आठ मोटारसायकली असा ऐकून दोन लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशन कडील गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनाप्रमाणे माहिती काढून आरोपी निलेश बापू बेलदार (२१) रा. देवळाली गाव याला अटक करण्यात आली त्याच्याकडून दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकींचे चोऱ्या होत आहे दुचाकी गाड्या चोरणाऱ्या विरुद्ध पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी मोटर सायकल चोरी प्रतिबंध विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी परिमंडळ दोन मधील सर्व पोलीस स्टेशन मधून १० पोलिस अंमलदार व एक अधिकारी यांची निवड करून पथक स्थापन केले त्याचप्रमाणे नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे कामे सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने नाशिक रोड गुणेशोत पथकाचे अंमलदार व मोटार सायकल चोरी प्रतिबंध पथकातील अंमलदार यांनी संयुक्त गोपनीय माहिती काढून दुचाकी गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून दहा मोटारसायकली व दोन मोबाईल फोन जप्त केल्या.
दरम्यान सदरची कामगिरी ही नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विष्णू गोसावी, अविनाश देवरे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे, विनोद लखन, शरद झोले, किरण गायकवाड, स्वप्निल जुन्द्रे, अजय देशमुख, अनंत महाले, तुकाराम जाधव, मुश्रीफ शेख यांनी ही कामगिरी केली या सर्वांचे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी अभिनंदन केले.