नाशिक – व्यापारी रोशनलाल ओमप्रकाश गोयल (६०) यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आडगाव शिवारातील हनुमाननगर येथे असलेल्या पार्क साईड इमारतीत येथे ते राहत होते. याच ठिकाणी ही घटना घडली. गोयल हे दोघे पती-पत्नी येथे राहत. या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने त्यातूनच गोयल यांनी बंदुकीतून उजव्या कानाच्या वर डोक्याजवळ स्वतः गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे वृत्त कळतात घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख पोलीस पथकाने धाव घेतली होती.