मालेगाव – मालेगाव मध्ये नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी रमजान पुरा पोलीस ठाण्यात अदनान खान यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अब्दुल खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याने पत्नीला पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवून मारले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. रमजान पुरा भागात खान कुटुंबिय राहतात. या दोन्ही नवरा बायकोत सातत्याने भांडणे होत असत. या भांडणात पती अब्दुल वफा हा नेहमी पत्नीला मारहाण करुन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे.