नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे अकरा लाखाच्या ऐवज लंपास केला. या घरपोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. महामार्गावरील के.के.वाघ महाविद्यालय परिसरातील दुर्गानगर भागात ही घरफोडी झाली. या घरफोडीची स्मिता पांडूरंग बोडके (रा.बंगला नं.४७ रा.दुर्गानगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोडके कुटुंबिय २० जानेवारी ते १६ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड आणि सोन्याचांदीचे अलंकार असा सुमारे ११ लाख ५० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरोज हरदास, अनिरूध्द आणि राहूल हरदास यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
? इन्फोसिसचे शेअर गडगडले *एलआयसीला तब्बल इतक्या हजार कोटींचा फटका*
https://t.co/YPAIu679VA#indiadarpanlive #bse #infosys #shares #it #company #lic #big #loss— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 17, 2023
? *अर्जुनला मैदानात पाहून भावूक झाला सचिन तेंडुलकर*
समोर आला हा व्हिडिओ
https://t.co/2gkpsstt8Q#indiadarpanlive #ipl #arjun #tendulkar #mi #play #sachin #tendulkar #video— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 17, 2023