मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काल नागपुरातील वज्रमुठ सभेला उपस्थित होते आणि आज त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
अजित पवार भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. शिवाय प्रकाश आंबेडकर आणि अंजली दमानिया यांनी पंधरा दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्फोट होणार आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बाबतीत काहीही घडले तरी त्याकडे सत्ताबदलाच्या नजरेतूनच बघितले जात आहे. काल ते नागपुरातील वज्रमुठ सभेला व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर आज पुण्यातील सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले. त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी सध्या बुथमध्ये काम करणाऱ्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे, असे सांगितले. पण त्याचवेळी त्यांनी पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत असल्याचे सांगितले. पक्षात येणाऱ्याचे आम्ही स्वागत करतो, पण त्याला पक्षाच्या विचारधारेशी जुळवून घ्यावे लागते. विचारधारा स्वीकारावी लागते. आमच्या विचारधारेशी सहमत झाले तर आमची काहीही अडचण नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत प्रशासकीय कामे
दिल्लीमध्ये प्रशासकीय कामांसाठी आलेलो आहे. इथे कोणत्याही राजकीय कामासाठी आलेलो नाही. राजकारणात खूप चर्चा होत असतात. पण या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसते, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
LIVE |?महाराष्ट्र भवन दिल्ली | माध्यमांशी संवाद https://t.co/e6rBVTEqtt
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 17, 2023
Maharashtra Politics Bawankule Delhi Ajit Pawar Pune