नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी शुक्रवारी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे.. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड, उपनगर व मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना अंबड लिंकरोडवरील डीजीपी नगर नं.२ भागात घडली. येथे राहणा-या ३६ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.योगेश सुभाष पाटील (रा.गायकवाड पार्क) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांनी शुक्रवारी (दि.३१) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत देवेंद्र निकम यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
दुसरी घटना मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीत घडली. शशिकांत देविदास शिरसाठ (३५ रा.सातभाई वाईन शॉप समोर जेलरोड) हे मुंबईनाका हद्दीतील फुडस आणि बॅक्वेट प्रा.लि. नावाची पाटी असलेल्या बंद गाळय़ात गळफास लावलेल्या अवस्थेत मिळून आले. गाळामालक वैभव रोकडे आणि नातेवाईकांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. सदर व्यक्तीने गाळा उघडून गळफास लावून घेतल्याचा अंदाज असून याप्रकरणी पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना जयभवानी रोड भागात घडली. येथे राहणा-या सुमित राजेंद्र ढोले (२४ रा.हरिमंत्र अपा.गायकवाड पेट्रोल पंपासमोर) या युवकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूमध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल राजेंद्र ढोले यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.