India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंचवटीत सायकलस्वार महिलेशी अश्लिल वर्तन; उपनगरमध्ये मायलेकीस जबर मारहाण

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in क्राईम डायरी
0

सायकलस्वार महिलेशी अश्लिल वर्तन
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम लिंकरोडवरील तलाठी कॉलनी सर्कल भागात पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वाराने सायकलस्वार महिलेशी अश्लिल वर्तन केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहे.

बोरगड भागातील २० वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास पीडिता तलाठी कॉलनी भागातून आपल्या सायकलीवर घरी परतत असतांना ही घटना घडली. तारवालानगर अमृतधामलिंकरोडने प्रवास करणा-या दुचाकीस्वाराने तिला सर्कल भागात गाठून संभाजी नगर कुठे आहे. असे विचारणा करून अश्लिल हावभाव केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.

शेजा-याकडून मायलेकास मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आनंदनगर भागात मुलासोबतचा वाद मिटवून टाका असे सांगितल्याचा राग आल्याने संतप्त शेजा-याने मायलेकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत ५८ वर्षीय महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबलू जगताप (३०) असे मायलेकांस मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पुजा हरिष भाटीया (रा.अमरज्योत अपा.आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. भाटीया गेल्या मंगळवारी (दि.१४) नाशिकरोड येथील सहाय्यक आयुक्तांच्या कोर्टात गेल्या होत्या. तारीख आटोपून सायंकाळच्या सुमारास त्या मुलगा प्रकाश याच्या समवेत घरी परतल्या असता ही घटना घडली.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये भेटलेल्या संशयित शेजा-यास त्यांनी मुलासमवेतचा वाद मिटवून टाकण्याची विनंती केली असता त्याने शिवीगाळ करीत मायलेकास बेदम मारहाण केली. या घटनेत महिलेस जमिनीवर पाडून छातीत व पोटात बुक्या मारण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला बिटको रूग्णालयातून अधिक उपचारार्थ एसएमबीटी महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.


Previous Post

अवकाळी पाऊस, गारपीटींमुळे नगर जिल्ह्यात २००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next Post

India Darpan Live News Updates

Next Post

India Darpan Live News Updates

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group