India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! रक्ताचे बनावट रिपोर्ट दिले… विवाहितेवर चुकीचे उपचार… असे झाले उघड… पॅथॉलॉजी लॅबच्या दोघांवर गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका मार्ग भागातील एका रक्ततपासणी करणा-या लॅबच्या दोन कर्मचा-यांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एका संशयितास अटक करण्यात आली आहे. रक्ताचे बनावट रिपोर्ट दिल्याने ३५ वर्षीय विवाहीतेवर चुकीचा उपचार करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. औषोधोपचारानंतर महिलेच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याने डॉक्टराच्या फेरतपासणीत ही बाब निदर्शनास आली. याबाबत रूग्णाच्या पतीने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात

निलोफर नुरमोहम्मद खान (२७ रा. रेणूकानगर, वडाळानाका) व उदय नारायण सिंग (२९ रा. डीजीपीनगर, कामटवाडे) अशी संशयितांची नावे असून त्यातील उदय सिंग यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रिजवान रमजान शेख (४२ रा.अशोका मार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे.

शेख यांच्या पत्नी नाजिया (३५) यांना अचानक त्रास होवू लागल्याने ते परिसरातील खासगी रूग्णालयात गेले होते. रविवारी (दि.१२) शेख दांम्पत्यास रक्ताची चाचणी करण्यास सांगण्यात आल्याने ते संशयित काम करीत असलेल्या लॅबवर गेले असता ही घटना घडली. शेख यांचा रक्तचाचणी अहवाल प्राप्त होताच निदानानुसार रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही.

उलट त्यांच्या जीवितास धोका झाल्याने डॉक्टरांना शंका आली. त्यांनी पुन्हा रक्तचाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा रक्त तपासणी करण्यात आली. त्यात दुस-याच आजारामुळे त्रास होत असल्याचे समोर आले. संशयितांनी दिलेल्या खोट्या रिपोर्टमुळे नाजिया शेख यांच्या जीवावर बेतले होते. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.


Previous Post

दोन घटनांमध्ये तरूणीसह एका विवाहीतेचा विनयभंग; पंचवटी आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

Next Post

२२ व्हिडिओ क्लीप, ३ व्हॉईस नोटस… तब्बल १ कोटी लाचेची ऑफर… अमृता फडणवीस यांच्या तक्रारीने खळबळ

Next Post

२२ व्हिडिओ क्लीप, ३ व्हॉईस नोटस... तब्बल १ कोटी लाचेची ऑफर... अमृता फडणवीस यांच्या तक्रारीने खळबळ

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group