India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मन मोकळं करण्यासाठी निशुल्क अ‍ॅपला भुलला… अन् दोन लाख गमावून बसला… असं घडलं हे सगळं…

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टिंडर अ‍ॅप लॉग इन करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून नोकरदाराच्या बँक खात्यातील दोन लाख लंपास केले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ भागात राहणा-या ४६ वर्षीय नोकरदाराने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

सोशल मिडीयावरील माहितीच्या आधारे सदर इसमास टिंडर अ‍ॅपची माहिती मिळाली होती. निशुल्क असलेल्या या अ‍ॅपची जगभरात ५५ कोटीहून अधिक सभासद संख्या असल्याने सदर व्यक्तीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. या अ‍ॅपच्या माध्यमातून स्त्री पुरूष सुरक्षितरित्या एकमेकांशी मनमोकळया गप्पा आणि रोमांस करीत असल्याने तरूणाईसह अविवाहीतांसाठी अ‍ॅप पर्वणी ठरली आहे.

सिंगल असलेल्यांना पार्टनर तर विवाह इच्छुकांना पंसतीनुसार वधू वराचे परिक्षणही या अ‍ॅपच्या माध्यमातून होते. या अ‍ॅपवर फेक युजर्स टाळण्यासाठी सरकारी कागदपत्राच्या आधारे युजर्स आयडी केली जात असल्याने खात्रीशीर मित्र मैत्रीण भेटण्याची संभावना अ‍ॅपच्या माध्यमातून होते. त्यामुळे नाशिकच्या नोकरदारास या अ‍ॅपचे आकर्षण होते.

२६ फेब्रुवारी रोजी सदर इसम मोबाईलवरील प्ले स्टोरच्या माध्यमातून या अ‍ॅपची पडताळणी करीत असतांना त्यांना ८९१०६७४९२९ व ९३३७०३८८४९ या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. सदर व्यक्तीने नोकरदारास टिंडर अ‍ॅपचे लॉग इन करून देण्याच्या बहाण्याने एनी डेस्क हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात भाग पाडून त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातील दोन लाख रूपयांच्या रकमेवर ऑनलाईन डल्ला मारला. सदरची रक्कम अन्य खात्यात वर्ग करून भामट्यांनी हा गंडा घातला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.


Previous Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडली; रुग्ण व नातेवाईकांचे प्रचंड हाल

Next Post

नाशिक शहरात बेकायदा वृक्षतोड केली… न्यायालयाने ठोठावली ही मोठी शिक्षा…

Next Post

नाशिक शहरात बेकायदा वृक्षतोड केली... न्यायालयाने ठोठावली ही मोठी शिक्षा...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group