India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक शहरात बेकायदा वृक्षतोड केली… न्यायालयाने ठोठावली ही मोठी शिक्षा…

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी महिलेसह एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने एक महिना साधा कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. मोठाभाऊ उर्फ दत्तू नारायण शिरसाठ (४४ रा.म्हाडा कॉलनी,सातपूर अंबड लिंकरोड) व भारती जयंत पटेल (४८ रा.रैनबो रो हाऊस पोकार कॉलनी दिंडोरीरोड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना २०१७ मध्ये पांजरापोळ भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पांजरापोळ भागातील सर्व्हे नं. ७४,७५.७६,७७ मध्ये २९ ऑगष्ट २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास दोघे जण वृक्षतोड करतांना मिळून आले होते. कुठलीही परवानगी न घेता दोघा आरोंपीनी सुबाभूळ ११,विलायची चिंच ६,काशिद ६,काटेरी बाभूळ २, कडू निंब १,बोर २ व बॉटल ब्रश दोन नग अशी ३० झाडे बुंध्यापासून तोडून नुकसान केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र शासन (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) चॅप्टर ८ व झाड जतन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुह्याचा तपास तत्कालीन हवालदार एस.जी.मेतकर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट ८ च्या न्या.प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अ‍ॅड. एस.एस.चितळकर यांनी काम पाहिले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून दोघांना एक महिना साधा कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

Legal Nashik Illegal Tree Cutting Court Sentence


Previous Post

मन मोकळं करण्यासाठी निशुल्क अ‍ॅपला भुलला… अन् दोन लाख गमावून बसला… असं घडलं हे सगळं…

Next Post

पोलिसास दुचाकीवरून पाडले…. न्यायालयाने तिघांना असा शिकवला धडा…

Next Post

पोलिसास दुचाकीवरून पाडले.... न्यायालयाने तिघांना असा शिकवला धडा...

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group