मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरीरोडवर भरदिवसा घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास; नाशिकरोडला त्रिकुटाची घरावर दगडफेक

by India Darpan
मार्च 14, 2023 | 3:09 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


दिंडोरीरोडवर भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. दिंडोरीरोडवरील वाढणे कॉलनीत घडलेल्या या घटनेत चोरटयांनी सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली यशवंत भोये (३२ रा.पांडूरंग अपा.वाढणे कॉलनी,म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

भोये कुटुंबिय सोमवारी (दि.१३) नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले १ लाख ४२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात सोनसाखळी,सोन्याचे वेढणे,वेढे,अंगठ्या व टॉप्सचा समावेश आहे. ही घटना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास कुटूंबिय घरी परतल्यानंतर उघडकीस आली. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

धुडघूस घालीत घरावर दगडफेक, पार्क केलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शस्त्रधारी त्रिकुटाने धुडघूस घालीत एका घरावर दगडफेक करून पार्क केलेल्या दुचाकीचेही मोठे नुकसान केल्याची घटना गोरेवाडीतील शास्त्रीनगर भागात घडली. परिसरातील दहशत कायम राहवी या उद्देशाने सराईतांनी हातात धारदार कोयते व तलवारी घेवून हे कृत्य केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छकुल्या वाघमारे (रा.गायकवाड मळा, ना.रोड) व त्याचे दोन अनोळखी साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप शंकर काकजीज (४५ रा.जयमाता किराणा समोर,शास्त्रीनगर,गोरेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित त्रिकुटाने रविवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास शास्त्रीनगर भागात हातात धारदार कोयते व तलावर घेवून धुडघूस घातला. परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी या टोळक्याने परिसरातील नागरीकांना शिवीगाळ व दमदाटी केली.

यावेळी संतप्त टोळक्याने काकजीज यांच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच संजय साबळे यांची दारासमोर पार्क केलेल्या एमएच १५ बीसी ०५९४ या दुचाकीची तोडफोड करून मोठे नुकसान केले. सदर टोळक्याची या भागात मोठी दहशत असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदूरनाक्यावर गावठी कट्टा घेवून फिरणारा गजाआड; सिडकोत वेल्डींग करताना एकाचा मृत्यू

Next Post

नाशकात गुंडगिरीला ऊत… खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे मागितली खंडणी… नकार दिल्याने थेट कारच पेटवली….

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

नाशकात गुंडगिरीला ऊत... खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे मागितली खंडणी... नकार दिल्याने थेट कारच पेटवली....

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011