India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात गुंडगिरीला ऊत… खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे मागितली खंडणी… नकार दिल्याने थेट कारच पेटवली….

India Darpan by India Darpan
March 14, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहरूगार्डन भागात खंडणी देण्यास नकार दिल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्याची कार पेटवून दिल्याची घटना घटना घडली आहे. या घटनेत कार साहित्यासह जळून खाक झाली आहे. याप्रकरणी दिपक संजय कपिले (रा.टकलेवाडा,रविवार पेठ) या व्यावसायीकान तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिले गेल्या काही दिवसांपासून नेहरू गार्डन भागात इडली व डोसा विक्रीचा व्यवसाय करतात. याच ठिकाणी अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्येही आपले दुकाने मांडत असल्याने रात्री उशीरापर्यंत या भागात खवय्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. रविवारी (दि.१२) रात्री कपिले आपला व्यवसाय सांभाळत असतांना परिसरातील घा-या नामक साराईताने त्यांना गांठून खंडणी मागितली.

या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरडोई २०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी संशयिताने केली. मात्र कपिले यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने कपिले आपल्या कामात व्यस्त असल्याची संधी साधत जिमखाना येथील पेअ‍ॅण्ड पार्क मध्ये पार्क केलेल्या त्यांच्या ओमनी कार एमएच १५ एएस १३३८ वर काही तरी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली.

कारमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी ठेवलेल्या प्लॅस्टीकच्या खुर्च्या व गॅस शेगडी होती. आर्थिक नुकसानीच्या उद्देशाने संशयिताने हे कृत्य केले असल्याचा आरोप कपिले यांनी केला असून, या घटनेत कारसह साहित्य जळून खाक झाले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे करीत आहेत.


Previous Post

दिंडोरीरोडवर भरदिवसा घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लंपास; नाशिकरोडला त्रिकुटाची घरावर दगडफेक

Next Post

‘अल्पवयीन मुलीच्या पाठीवर व डोक्यावर हात फिरविणे विनयभंग नाही’, न्यायालयाने तरुणाची शिक्षा केली रद्द

Next Post

'अल्पवयीन मुलीच्या पाठीवर व डोक्यावर हात फिरविणे विनयभंग नाही', न्यायालयाने तरुणाची शिक्षा केली रद्द

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group