India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वडिलांबरोबर बँकेत गेलेल्या मुलीच्या बॅगेतील ३२ हजार चोरट्यांनी केले लंपास

India Darpan by India Darpan
March 10, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


वडिलांबरोबर बँकेत गेलेल्या मुलीच्या
बॅगेतील ३२ हजार चोरट्यांनी केले लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लेखानगर शाखेत वडिलांबरोबर बँकेत गेलेल्या मुलीच्या बॅगेतील ३२ हजार चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी प्रविण दत्तात्रेय शिरोडे (५१ रा.दामोदरनगर,चेतनानगर) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरोडे गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास आपल्या मुलीस सोबत घेवून स्टेट बँकेच्या लेखानगर शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. शिरोडे कॅशिअर समोरील रांगेत पैसे भरण्यासाठी उभे असतांना मुलगी बँकेतील दोन महिला बसलेल्या बाकड्यावर जावून बसली होती. यावेळी भामट्या महिलांनी मुलीने बाकड्यावर ठेवलेल्या सॅग बॅगेची चैन उघडून ३२ हजाराची रोकड हातोहात लांबविली. ही घटना बँकेतील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलिस भामट्या महिलांचा शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३२ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धात्रकफाटा परिसरात घडली आहे. अनिल एकनाथ उफाडे (रा.कल्पतरू बंगला,महालक्ष्मीनगर कुबोटा शोरूममागे) असे मृत युवकाचे नाव आहे. उफाडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उफाडे याने गुरूवारी (दि.९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला इलेक्ट्रीक वायर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. भाऊ सुनिल उफाडे यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.


Previous Post

होळीनंतर बाथरुममध्ये आंघोळ करत असताना दाम्पत्याचा मृत्यू; गॅस गिझरने केला घात

Next Post

विक्री केलेल्या सदनिकेवर पूर्वीच्या मालकाने परस्पर केला कर्जाचा बोजा; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

Next Post

विक्री केलेल्या सदनिकेवर पूर्वीच्या मालकाने परस्पर केला कर्जाचा बोजा; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group