India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

होळीनंतर बाथरुममध्ये आंघोळ करत असताना दाम्पत्याचा मृत्यू; गॅस गिझरने केला घात

India Darpan by India Darpan
March 10, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – घराघरात सर्रासपणे गॅस गिझरचा वापर होत आहे. मात्र, हेच गॅस गिझर अनेकदा धोकादायक ठरत आहे. असाच प्रकार गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये घडला आहे. येथील अग्रसेन विहार कॉलनीत उद्योजक दीपक गोयल (४०) आणि त्यांची पत्नी शिल्पी (३६) यांचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाला. होळी खेळल्यानंतर दोघेही घराच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूममध्ये गॅस गिझर लावून आंघोळ करत होते. गॅस गिझरमधून विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होऊन गुदमरल्याने मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाथरूममध्ये वायुवीजन नव्हते. दोघांनाही जीव वाचवण्यासाठी ओरडण्याचीही संधी मिळाली नाही.

कुटुंबीयांसह होळी खेळल्यानंतर दोघे दुपारी तीन वाजता आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. साडेचारपर्यंत तो बाहेर न आल्याने मुले चिंतेत होती. त्यांनी बाथरुमजवळ जाऊन आई-वडिलांना हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती सतावू लागली. बाथरुमचा दरवाजा हाताने वाजवूनही तिथून आवाज न आल्याने मुले शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली. तसेच काका नितीनला फोन करून मुलांनी बोलावले.

नितीन म्हणाला की, तो आणि शेजारी घरी पोहोचले. बाथरुमचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. भाऊ आणि वहिनी बेशुद्ध पडलेले होते. दोघांच्या चेहऱ्यावर पाणी टाकल्यानंतरही त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होताना दिसली नाही. अखेर त्यांना गाझियाबादमधील डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला गॅस गिझरमुळे बाथरूममध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याचे दिसते. यातून विषारी वायू तयार झाला. या वायूमुळे दोघे गुदमरले. वायुवीजनासाठी खिडकी नव्हती. एक छोटी खिडकी होती पण ती बंद होती. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या दाम्पत्याची मुलगी भावी (13) आणि मुलगा शौर्य (11) रडत आहेत. त्यांची प्रकृती बिघडली आहे. रुग्णालयातून दाम्पत्याचे मृतदेह घरी आल्यावर आई-वडिलांचे काय झाले, असाच प्रश्न दोघांकडूनही विचारला जात होता. काही वेळापूर्वीपर्यंत सर्व काही ठीक होते. दीपक गोयल यांची आई मिथलेश आपल्या मुलाचे आणि सुनेचे मृतदेह पाहून बेशुद्ध पडल्या होत्या. पाऊण तासापूर्वी सर्वांसोबत होळी खेळणारी व्यक्ती आता आपल्यात नाही यावर कुटुंबीयांना विश्वास बसणे कठीण जात होते. दीपक गोयल यांनी काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये रासायनिक कारखाना उघडला होता.

Gas Geyser Couple Death in Bathroom while Bathing


Previous Post

सिडकोतील भूखंडाची बेकायदा विक्री; तत्कालिन प्रशासकासह लिपीक आणि भूखंड खरेदी करणा-याविरोधात गुन्हा दाखल

Next Post

वडिलांबरोबर बँकेत गेलेल्या मुलीच्या बॅगेतील ३२ हजार चोरट्यांनी केले लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

वडिलांबरोबर बँकेत गेलेल्या मुलीच्या बॅगेतील ३२ हजार चोरट्यांनी केले लंपास

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group