नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक भागात विश्रांतीसाठी बसविण्यात आलेले लोखंडी बाकडे चोरट्यांनी चोरून नेल्याची नेले. ही चोरी करतांना चोरट्यांनी आठ बाकडे खोलून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेचे अधिकारी संजय दगडू ओहोळ यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ओहोळ उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागात कार्यरत आहेत. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात महापालिकेच्या वतीने नागरीकांच्या विश्रांतीसाठी व दैनिंदिन वापरासाठी लोखंडी बॅन्चेस बसविण्यात आले आहे. त्यातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे आठ बाकडे चोरट्यांनी खोलून नेले. ही बाब निदर्शनास येताच महापालिकेच्या वतीने पोलिसात धाव घेण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.