India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सोसायटीच्या मिटींगमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून शेजा-याने केली बेदम मारहाण

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


सोसायटीच्या मिटींगमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून शेजा-याने केली बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील केवलपार्क रोड भागात सोसायटीच्या मिटींगमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून शेजा-याने एकास बेदम मारहाण केली. या घटनेत संशयिताने धारदार शस्त्राचा वापर केल्याने युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी राकेश अशोक बोरसे (३२ रा.वसूंधरा हाईटस,लक्ष्मण टाऊनशिपजवळ) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात मारहाणाची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर खैरनार (३४) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि तक्रारदार एकाच सोसायटीतील रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. शनिवारी (दि.४) सोसायटीतील सदस्यांची मिटींग बोलविण्यात आली असता ही घटना घडली. सदस्यांच्या बैठकीत संशयिताने मागील भांडणाची कुरापत काढून बोरसे यांना शिवीगाळ केली. यावेळी बोरसे यांनी त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त खैरनार याने त्यांना धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत धारदार शस्त्राने बोरसे यांच्या चेह-यावर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून दोघा भावांना लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्दारका परिसरात पूर्व वैमनस्य आणि पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून एकाने दोघा भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत दोघे भाऊ जखमी झाले आहे. याप्रकरणी सिध्दार्थ सुरेश दलोड (२९ रा.महालक्ष्मी चाळ,द्वारका) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदिप उर्फ पिंटू परशराम तसाबंड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित व तक्रारदार यांच्यात पूर्ववैमनस्य असून दलोड बंधू पोलिसांना माहिती देतात या संशयातून ही घटना घडली. व्दारका भागातील कावेरी हॉटेल भागात शनिवारी (दि.४) रात्री सिध्दार्थ व सिध्दांत हे दोघे भाऊ गेले असता संशयितांने त्यांना गाठून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात सिध्दार्थ याच्या मनक्यास डोक्यास व पायाच्या गुडघ्यास तर सिध्दांत यांच्या उजव्या खांद्यास व हातास गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास पोलिस नाईक सय्यद करीत आहेत.


Previous Post

नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा काय आहे? याच प्रकरणात राबडी देवींची होतेय सीबीआय चौकशी

Next Post

विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन वृध्दास ५० हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा

Next Post

विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन वृध्दास ५० हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group