नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात टीव्हीचे बटन सुरू करत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ७४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अलकाबाई देवराम गायकवाड (रा.महेंद्रा गोडावूनजवळ,श्रमिकनगर) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अलकाबाई गायकवाड या गुरूवारी (दि.२) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील टीव्ही सुरू करीत असतांना ही घटना घडली. इलेक्ट्रीक बोर्डातील टीव्हीचे बटन सुरू करीत असतांना त्यांच्या डाव्या हाताला शॉक लागला होता. या घटनेत त्या बेशुध्द झाल्याने मुलगा सोमनाथ गायकवाड यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषीत केले.