India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यात लाचखोरीला ऊत! मनमाड नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक, रोखपाल व शिपाई जाळ्यात; ३६ हजाराची घेतली लाच

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड नगरपरिषदेच्या लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक, रोखपाल व शिपाई ३६ हजाराच्या लाच प्रकरणात लाचलुचपत विभागाच्या जाळयात सापडले आहे. यात वरिष्ठ लिपिक आनंद प्रभाकर औटी ,रोखपाल संजय बबन आरोटे .शिपाई. नंदू पंडीत म्हस्के यांचा समावेश आहे.

मनमाड नगर परिषदेत तक्रारदार यांनी कन्स्ट्रक्शन फर्मचे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा केले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात यातील औटी व म्हस्के यांनी टक्केवारीनुसार ३६ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आज ३६ हजार रुपये लाचेची रक्कम यातील आलोसे म्हस्के व आरोटे यांनी तक्रारदार यांचेकडून स्वीकारतांना त्यांना लाच लुपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. ही कारवाई अँन्टी करप्शन ब्युरोचे निरीक्षक अनिल बागुल, पो. ना. किरण अहिरराव, अजय गरूड, परशुराम जाधव यांनी केली.

*यशस्वी सापळा*
*युनिट – ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार- पुरुष, वय 52 वर्ष. रा. मनमाड, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक.
*आलोसे-
१ आनंद प्रभाकर औटी , वय-46 वर्ष, वरिष्ठ लिपिक, लेखा विभाग, नगरपरिषद,मनमाड. ता. नांदगाव जि.नाशिक.
२. संजय बबन आरोटे वय.- 52 वर्ष.व्यवसाय -रोखपाल ,लेखा विभाग, नगर परिषद मनमाड, ता. नांदगाव. जि. नाशिक.
३. नंदू पंडीत म्हस्के वय.- 58 वर्ष. व्यवसाय- शिपाई. लेखा विभाग नगर परिषद मनमाड ता. नांदगाव. जि.नाशिक
*लाचेची मागणी– 36,000/-रु.दि.02/ 03/2023
*लाच स्विकारली- 36,000/-रु. दि.03/03/2023
*हस्तगत रक्कम– 36,000/ रुपये.

*लाचेचे कारण -.
यातील तक्रारदार हे काम करत असलेल्या कन्स्ट्रक्शन फर्म चे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आलेले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात यातील आलोसे क्रमांक एक व तीन यांनी टक्केवारीनुसार 36,000/- रुपये लाचेची मागणी करून आज दिनांक 3/03/ 2023 रोजी 36,000/- रुपये लाचेची रक्कम यातील आलोसे क्र.3 व 2 यांनी तक्रारदार यांचे कडून स्वीकारली असून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत
*सापळा अधिकारी-
अनिल बागुल, पोलीस निरीक्षक , अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
*सापळा पथक-
पो. ना. किरण अहिरराव
पो. ना.अजय गरूड
चा. पो ना. परशुराम जाधव.
सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक

Nashik Manmad Nagar Parishad 3 ACB Trap Bribe Corruption


Previous Post

अभिनेता अर्शद वारसीसह त्याच्या पत्नीवर ‘सेबी’ची मोठी कारवाई; आता पुढे काय होणार?

Next Post

टीव्हीचे बटन सुरू करत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ७४ वर्षीय महिलेचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक फोटो

टीव्हीचे बटन सुरू करत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ७४ वर्षीय महिलेचा मृत्यू

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group