नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवार कारंजा भागात घरात फेरफटका मारत असतांना अचानक तोल जावून पडल्याने ८३ वर्षीय वृद्दाचा मृत्यू झाला. प्रभाकर केशवराव सोनार (रा.गोरेराम कॉम्प्लेक्स,गोरेराम लेन) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनार गेल्या गुरूवारी (दि.२३) आपल्या राहत्या घरात फेरफटका मारत असतांना अचानक तोल जावून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने योगेश इखनकर यांनी त्यांना तातडीने श्री सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्य झाला. याबाबत डॉ.ललित हिरवे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.