नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ४० हजाराची लाच स्विकारतांना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिक निलेश शंकर कापसे यांना रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये व सदर नकाशावर शासकीय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे ५० हजार याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देणेस सांगितल्याने त्यानंतर प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे ४० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. ही लाच कापडे यांनी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्यासह सापळा पथकातील पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन,पो. शि. नितीन नेटारे यांनी केली.
*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई*
*युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
*तक्रारदार-* पुरुष, 30 वर्ष.
रा. पळसे गाव, तालुका, जिल्हा नाशिक
*आलोसे* –
निलेश शंकर कापसे, वय- 37 वर्ष, धंदा- प्रतिलिपी लिपिक, भूमी अभिलेख कार्यालय, नाशिक, राहणार- नवोदय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नंबर 6, उदयनगर, मखमलाबाद रोड नाशिक
*लाचेची मागणी-* ४०,०००/- रुपये दि. २७/०१/२०२३
*लाच स्वीकारली* – ४०,०००/-दिनांक – २७/०२/२०२३
*लाचेचे कारण -*.
यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये व सदर नकाशावर शासकिय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे 50,000 याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देणेस सांगितल्याने आलोसे याने प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे 40 हजार रुपये लाचेची मागणी करून पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी :-* उपसंचालक, भूमि अभिलेख नाशिक प्रदेश, नाशिक
*सापळा अधिकारी*
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक*-
पो. हवा. एकनाथ बाविस्कर
पो. ना. प्रकाश महाजन
पो. शि. नितीन नेटारे
**मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक.
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.