नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीरामनगर भागात बंद घर फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या रोकडसह देवघरातील चांदीचे देव चोरून नेल्याची घटना घडली.याप्रकरणी भाऊसाहेब बेल्म मोकळ (६५ रा.मारूती मंदिर गार्डन जवळ श्रीरामनगर,म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोकळ कुटुंबिय मंगळवारी (दि.२१) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा मागील लोखंडी गेटची कडी तोडून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेली दोन लाखाची रोकड आणि देवघरातील चांदीचे देव असा सुमारे दोन लाख एक हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.