नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने च्या पथकाने ११ दुकाने फोडणा-या चोरट्यास गजाआड केले आहे. या चोरट्याने शहरात सहा व ग्रामिण भागात पाच अशी ११ दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे १ लाख १६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गेल्या वर्षी घरफोडीच्या गुह्यात शिक्षा भोगून बाहेर पडताच त्याने या चो-या केल्या. हसन हमजा कुट्टी (४४ रा.नवनाथनगर,पेठरोड) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.
कुट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्ह्येगार असून यापूर्वी १४ घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. पंचवटीतील एका गुह्यात शिक्षा भोगून गेल्या वर्षी तो कारागृहाबाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, मुंबईनाका, भद्रकाली तसेच ग्रामिण भागातील नाशिक तालूका, वणी,वाडिव-हे या ठिकाणी दुकाने फोडली. त्याचबरोबर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सोलापूर व मध्यप्रदेशातील शिंदवाडा येथेही सात ते आठ गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे पोलिस आता त्याच्या साथीदारांचाही शोध घेत आहेत.
संशयितास मुद्देमालासह आडगाव पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक विष्णू उगले,चेतन श्रीवंत,अंमलदार रविंद्र बागुल,प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,नाझिमखान पठाण,विशाल काठे,मुक्तार शेख,अप्पा पानवळ,राजेश राठोड,शरद सोनवणे आदींच्या पथकाने केली.
असा अडकला जाळ्यात
शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे कर्मचारी विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत हसन कुट्टी हा पेठरोडवरील नवनाथ नगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि.६) सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकला. सापळयाची चाहूल लागताच संशयिताने अॅक्टीव्हा दुचाकीवर पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून गजाआड केले.